यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगरदे येथील अंगणवाडी केंद्रात चुकीच्या लसीकरणामुळे एका बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. निकीता प्रेमराज पावरा (वय ४ महीने) असे मयत बालिकेचे नावं असून निकितासोबत इतर ८ मुलांनाही लस देण्यात आली होती. ती मुलं देखील आजारी पडली असून सर्वाना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, साधारण तीन दिवसापुर्वी पिंटू जिनु पावरा (वय ७) हा बालक देखील दगावला आहे. रोगांना प्रतिबंध करणारी एक लस दिल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
डोंगरदे येथील जिल्हा परिषद शाळेत १६ तारखेला लहानग्यांना लसीकरणाचा कार्यक्रम होता. त्यानुसार काही बालकांना लसीकरण देण्यात आले. त्यातल्या एका मुलीला लसीकरणानंतर त्रास झाल्यामुळे त्यांना यावल ग्रामीण दाखल करण्यात आले. परंतु तिथेच उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याव्यतिरिक्त सात मुलांनाही या लसीकरणानंतर त्रास झाल्याचे वृत्त साहे. बुधवार रात्री पासून हिवताप उलटया संडाशीची लागण झाल्याने ९ बालकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान निकिता नामक बालिकेचा मृत्यू झाला तर दुसऱ्या बालकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोंगरदे गावात २० मार्चच्या सायंकाळ पासुन पाडयावर राहणारे रोशनी बिलाल सिंग चव्हाण (वय ८ महीने), पवन विनोद पावरा (वय३ महीने), आनंद रिसला पावरा (वय ३ वर्ष) कृष्णा गुमानबारेला (वय अडीच वर्ष), भरत सुनिल पावरा (वय ३ वर्ष), शरद सुनिल पावरा (वय ३ महीने), दिक्षा नितिन पावरा (दीड वर्ष), यांना लस दिल्यापासून त्रास होत होता. निकीता दगावल्याचे वृत्त असून पिंटू जिनु पावरा (वय ७ महीने वर्ष) याचा देखील चुकीच्या लासिकारणामुळेच दगावल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे वृत कळताच यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, यांच्या पथकाने तात्काळ दक्षता घेऊन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ. शुभम जगताप यांनी सांगीतले.