कारच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

0
23


जळगाव प्रतिनिधी । भरधाव कारने दिलेल्या धडकेत तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शहरातील खोटेनगर परिसरात घडली.

याबाबत वृत्त असे की, खोटेनगर भागातील पांडुरंग नगरात सुधीर चावरिया यांनी भाड्याने घर घेतले असून ते शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथे सामान टाकत होते. याप्रसंगी त्यांनी तीन वर्षाची मुलगी टिना ही अंगणात उभी होती. इतक्यात एमएच-१४, एचजी-३२०३ या भरधाव वेगात आलेल्या कारने तिला धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला. या कारचा चालक धनंजय पंढरीनाथ माळी (वय ३०, रा.संत मीराबाईनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here