जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद ते शिरसोली रेल्वे रूळावर रेल्वे अपघाताने एका अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाल्याने मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील म्हसावद ते शिरसोली दरम्यानच्या अप लाईन रेल्वे रूळवरील रेल्वे खंबा क्रमांक ३९९ नजीक रेल्वेच्या धक्क्याने अंदाजे ६० वर्षीय अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याचे बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४४ मिनीटांनी समोर आले. या घटनेबाबत म्हसावद रेल्वे प्रबंधक यांनी एमआयडीसी पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक अतुल पाटील, पोकॉ फिरोज तडवी यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील आणि फिरोज तडवी करीत आहे.