देवपिंप्री येथे विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू

electrocution cover

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवपिंप्री येथे आपल्या मावशीच्या शेतात पेरणी करीत असताना विजेच्या खांबाला ताण दिलेल्या ताराला हात लागल्याने शॉक लागून एका किशोरवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२३) घडली.

 

अधिक माहिती अशी की, सारोडा (जि. खंडवा, मध्य प्रदेश) येथील रहिवासी असलेला विशाल मोहन तंवर (वय १६) हा आपल्या मावशीकडे देवपिंप्री येथे आला असता पेरणीसाठी शेतात गेला होता. पेरणी करीत असताना विजेच्या खांबाला ताण म्हणून असलेल्या तारेत वीजप्रवाह उतरलेला होता, ते लक्षात न आल्याने तारेला स्पर्श होताच विशाल शॉक लागून जागीच गतप्राण झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले, तेव्हा डॉक्टरांनी त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. विशाल हा त्याच्या आये-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. उपजिल्हा रुग्णालयात त्याच्या बहिण व मावशी यांनी एकच हंबरडा फोडला.

Protected Content