एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महिलेचा पलंगाजवळ असलेल्या झोक्याचा फास बसून मृत्यू झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील सावदे गुरुवारी ६ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.
आशाबाई उर्फ रामबाई मच्छिन्द्र मुलमुले (वय ४६, सावदे प्र. चा. ता. एरंडोल) असे मयत महिलेचे नाव आहे. गावात त्या पती, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होत्या. पती मच्छिन्द्र हे जवळच एका खदानीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यान गुरुवारी ६ जून रोजी त्या घरी एकट्याच असताना पलंगाजवळ झोपलेल्या होत्या. तेव्हा पलंगाजवळ असलेला झोक्यात जाऊन त्यांच्या मानेला फास बसला व त्या मृत्युमुखी पडल्या. शेजारच्या लहान मुलाने गावात जाऊन माहिती दिली तेव्हा घटना उघड झाली.
नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी आशाबाई यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.