चक्कर येऊन पडल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेत चक्कर येऊन पडल्याने नऊ वर्षांच्या विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, मनवेल येथील आदिवासी आश्रमशाळेत फुलसिंग पहाडसिंग बारेला हा नऊ वर्षाचा विद्याथ शिकत होता. आज सकाळी अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.

मयत फुलसिंग बारेला हा हिंगोणा येथील रहिवासी होता. त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रूग्णालय गाठून या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तर, या संदर्भात अजून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी पवन पाटील यांनी येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली.

Protected Content