Home Cities मुक्ताईनगर वाढदिवसाला चिमुकलीचा करूण अंत : वीज धक्क्याने घडली दुर्घटना

वाढदिवसाला चिमुकलीचा करूण अंत : वीज धक्क्याने घडली दुर्घटना

0
38

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कुलरमध्ये उतरलेल्या वीज प्रवाहामुळे तीव्र धक्का लागून येथील चिमुकलीचा तिच्या नवव्या वाढदिवसालाच मृत्यू झाल्याची करूण घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैष्णवी चेतन सनान्से, हिचे शुक्रवारी कुलरच्या माध्यमातून विजेचा शॉक लागुन दुर्दैवी निधन झाले. गोपाळ बळिराम सनान्से ( रा. चिंचोल ह. मु. मुक्ताईनगर ) यांची ती नात होती. परमेश्वराने आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काळाने घात केला. ती बालिका ओम साई सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.सुभाष सनान्से यांची पुतणी तर चेतन महाराज (अंत्यविधी,भजनी मंडळ) याची कन्या होती.

वैष्णवीच्या वाढदिवसाला घरात अतिशय आनंदाचे वातावरण असतांना तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सनान्से परिवारावर मोठा आघात झाला आहे. आज सकाळी तिच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


Protected Content

Play sound