Home क्राईम भरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू !

भरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू !


साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवेवरील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हरणाचा मृत्यू झाल्याची घटना साकेगाव नजीक घडली आहे.

साकेगावसह परिसरातील शिवारात हरणांचे कळप मोठ्या संख्येने असून रात्री हरीणांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. याच प्रकारे हायवे ओलांडून जात असलेल्या हरणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. आज पहाटे हरिणाचा मृतदेह हायवेच्या बाजूला आढळून आल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन खात्याच्या अधिकारी घोगरे, साकेगावचे पोलीस पाटील गणेश भोई, ग्रामपंचायत सदस्य विलास ठोके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound