जळगाव (प्रतिनिधी) शहापूर तालुका बराणपुर येथील दोन तरुण दुचाकीने जळगावहून परत जात असताना वरणगाव फुलगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. यातील राहुल बारी या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. याबाबत नशिराबाद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल धनराज बारी (वय 24)आणि त्याचा मावसभाऊ उमेश बारी (वय 28, दोघं रा. शहापूर ता. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) हे दोघे दुचाकीने 25 रोजी सायंकाळी 6 वाजता शहापूर येथून जळगावला काही कामानिमित्त आले होते. जळगाव येथील काम आटोपल्यानंतर दोघे दुचाकीने शहापूरकडे जात असताना 25 रोजीच रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वरणगाव पुलगाव रेल्वे फाट्यावर समोरून येणाऱ्या रिक्षेला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात दोघं गंभीर जखमी झाले होते. दोघांना गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास जखमी राहुल बारी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत नशिराबाद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.