Home क्राईम सामनेर येथे झिरो वायरमनचा खांबावरून पडल्याने मृत्यू

सामनेर येथे झिरो वायरमनचा खांबावरून पडल्याने मृत्यू

0
40

images 3

जळगाव ( प्रतिनिधी)| पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे इलेक्ट्रिक खांबावर काम करत असताना पाय सटाकल्याने झिरो वायरमनाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, सामनेर शहरात वायरमन म्हणून काम करतात. संभाजी कौतिक साळुंखे (वय ४५) हे आज दुपारी चार वाजेच्या सुमारास गावाकड इलेक्ट्रिक पोलवर काम करत असताना पाय सटकल्याने पंधरा फूटावरून खाली आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात नेत असताना शिरसोली गावाजवळ त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत पाचोरा पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound