विष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

poison sign
poison sign


poison sign

जळगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील बांबरुड येथील एका प्रौढ व्यक्तीने नुकतेच विषारी औषध प्राशन केले होते, त्याचा आज रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील बांबरुड येथील रहिवासी सुरेश शंकर शिंदे (वय ४०) यांनी कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात पिकांवर फवारण्याचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न ३ मे रोजी केला होता. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ८ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पो.हे.काँ. विकास देशमुख आणि पोलीस नाईक ललित भदाणे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here