Home क्राईम नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह

नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह

0
36

जळगाव प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील दयाराम नगरातील नाल्यात सोमवारी सकाळी किशोर साबळे ( वय २७ ) या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मूळ नांद्रा हवेली येथील साबळे कुटुंबीय चंदूआण्णानगरातील बांधकाम साईटवर मजूर म्हणून कामाला आहे. ते त्याच ठिकाणी वास्तव्य करतात. याठिकाणी किशोर साबळे हा त्याची आई, पत्नी, बहिणीसह वास्तव्यास होता. साबळे हा साईटवर वॉचमन म्हणून कामाला आहे. रविवारी रात्री तो घराबाहेर पडला होता. किशोर हा रात्री पुन्हा घरी न परल्याने त्याची आई शांताबाई तसेच बहिणी मंगलाबाईकडून त्याचा परिसरात शोध घेतला जात होता. दरम्यान, महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवराम नगर मध्ये नाल्यात एका तरुण पडलेला दिसला. त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक जी.एस.चव्हाण, ईश्‍वर लोखंडे यांनी घटनास्थळ गाठले. हा मृतदेह किशोर साबळेचा निघाला. रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दारुच्या नशेत नाल्यात पडून त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. किशोरच्या पश्‍चात पत्नी, गायत्री, आरती, व माधुरी अशा तीन मुली, बहिणी मंगलाबाई असा परिवार आहे. रुग्णालयात कुटूंबियांनी एकच आक्रोश केला होता. किशोरचे वडील वारले असून तो घरातील कर्ता पुरुष होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound