मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सर्वांत लोकप्रिय झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु झाली असून या योजनेला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गंत पात्र महिलांना प्रति महिना १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जातात. आता लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून ५५०० रुपयांचा दिवाळी बोनसही दिला जाणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा आणि निर्णयांचा सपाटा लावला आहे. अशातच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थाी महिलांना आता दिवाळी बोनस दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थाी महिलांना ५५०० रूपये दिवाळी बोनस मिळणार असल्याचे समजते. ही रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. ३००० रूपयांचा दिवाळी बोनस आणि २५०० रुपये अतिरिक्त दिले जाणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम महिन्याला मिळणा-या १५०० रूपयांच्या व्यतिरिक्त असेल,अशीही माहिती मिळाला आहे.
दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुका डोळासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी आणि मते मिळवण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली असा आरोप या नोटीसीतून करण्यात आला आहे. तसेच पाच दिवसांत त्यावर उत्तर देण्याची मागणी करण्यात आली आहे.