यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा सिम येथे गटारीत कुणीतरी अनोळखी व्यक्तीने स्त्री जातीचे अर्भक सोडून दिल्याची घटना उघडकीस आली असुन पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठविले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की सावखेडा सिम तालुका यावल या गावात दिनांक २५ रोजी गावातील एका व्यक्तीस कुणीतरी अपुर्ण दिवसाचे स्त्री जाती मृत अर्भक टाकुन दिल्याचे दिसले. तत्काळ त्यांनी गटारीतून हा ब्रक बाहेर काढला गावातील पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना सांगितले.
याबाबत यावल पोलिसात दूरध्वनी द्वारे सुद्धा कळविण्यात आले आहे सदर अर्भक स्त्री जातीचे असून ते पाच ते सहा महिन्यांचे असावे असा अंदाज ग्रामस्थांकडून काढला जात आहे. सदरचे असे हे घृणास्पद कृत्य करणार्या नराधमास किंवा त्या अज्ञात महिलेस शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहे.
दरम्यान हा प्रकार पाहण्यासाठी सावखेडा सिम गावातील ग्रामस्थांनी मोठया प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती. सावखेडा सिम गावात सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. यावेळी पोलीस पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात माहिती कळविल्यावर पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून तात्काळ घटनेचे गांभींय लक्षात घेत सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व हेकॉ राजेन्द्र पवार यांनी सावखेडा सिम येथे घटनास्थळी भेट देत मृत अर्भकास पंचमाना करीत ताब्यात घेतले आहे . दरम्यान अशा प्रकारे मृत अर्भक फेकुन दिल्याची दोन महीन्यातील दुसरी घटना आहे. यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.