मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एका मुलाखतीत शरद पवार यांनी अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीही मुलगी-पुतण्या असा भेद केला नाही. सुप्रिया सुळे आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही. याउलट अजित पवार यांना कायमच सत्तापदे देण्यात आली. अजित पवार यांना राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीनवेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली असून त्या दिल्लीच्या राजकारणात आहेत.
पुढे ते म्हणाले की, सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत, दाव्यात तथ्य नाही. विरोधी पक्षनेत्याचे पद आणि विरोधी पक्षही लोकशाहीत कायम महत्त्वाचा असतो. माझ्या 56 वर्षांच्या कारकीर्दीत मी केवळ 20 वर्षे सत्तेत होतो. उर्वरित काळ मी विरोध पक्षात घालवला. एस.एम. जोशी, कृष्णराव धुळप, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्षात राहून आपले स्थान निर्माण केले. बॅरिस्टर पै नाथ बोलायला उभे राहिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुही थांबून त्यांचे भाषण ऐकायचे. परंतु, राष्ट्रवादीचे काही नेते सत्तेविना राहू शकत नव्हते. त्यांनी पाच वर्षे विरोधात काढली होती. या मंडळींना भाजपसोबत जाण्याची घाई झाली होती. पण मी त्यांना सांगितले होते की, पाहिजे तर तुम्ही जा, मी येणार नाही. शरद पवार यांनी अजित पवार यांची ही भूमिका खोडून काढली