मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरीषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकांच्या निवडणुकांची उत्सुकता लागली होती. या साठीच्या प्रारूप याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकांची घोषणा केली आहे. यात १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने आज मतदान आणि मतमोजणीच्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभाग रचना रद्द करून नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून व्हावी अशी मागणी केली आहे. यातच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देखील प्रलंबीत आहे. यामुळे राज्य सरकार निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता देखील आहे.