Home Cities एरंडोल दारूच्या नशेत बँकेच्या रोखपालास मारहाण

दारूच्या नशेत बँकेच्या रोखपालास मारहाण


Crime l 2

एरंडोल प्रतिनिधी । कोणतीही स्लीप न भारता मला माझ्या खात्यातून पैसे द्या असे सांगुन युनियन बँकेच्या रोखपालास दारूच्या नशेत एका ग्राहकाने मारहाण केल्याची घटना रिंगणगाव (ता.एरंडोल) येथे आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले कि आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गोरख ओंकार कोळी राहणार रवंजे बु.ता.एरंडोल हे रिंगणगाव येथील युनियन बँक ऑफ इंडिया च्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले त्यांनी रोखपाल राजेंद्र लक्ष्मण रोहीमारे यांचेकडे पैशांची मागणी केली.रोखपाल राजेंद्र रोहीमारे यांनी पैसे काढण्याची स्लीप भरून द्या असे गोरख कोळी यांना सांगितले.याचा राग आल्याने गोरख कोळी यांनी दारूच्या नशेत रोखपाल राजेंद्र रोहीमारे यांना शिवीगाळ करून छाती व तोंडावर मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शासकीय कामकाजात अडथळा आणला.याबाबत रोखपाल राजेंद्र रोहीमारे यांनी दिलेल्या तक्रारी वरून गोरख कोळी यांचें विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुलकर्णी व हवालदार अकिल मुजावर तपास करीत आहेत.दरम्यान मारहाण केल्या नंतर गोरख कोळी हा फरार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound