जळगाव प्रतिनिधी । पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील भजे गल्लीत एका तरूणाला चौघांनी दारू पिण्याच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याचा रविवारी सायंकाळी घडला.
शहरातील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या भजेगल्लीत सायंकाळ 6 वाजेपासून ते रात्री 11.30 वाजेपर्यंत मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. कोणत्या ना कोणत्या कारणावरून दारू पिणाऱ्यांमध्ये सतत वाद निर्माण होत असतात. असाच वाद हॉटेल राज समोर रविवारी सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास घडला. यात एका तरूणाला दारू पिण्यावरून इतर चौघांनी बेदम मारहाण केल्याचे प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. अवघ्या 100 मीटर अंतरावर पोलीस अधिक्षक कार्यालय आहे. समोर ही भजे गल्लीत दारूड्यांचा धिंगाणा असतो. काही वेळेला सर्व दुकाने बंद होऊन देखील येथे दारू पिणाऱ्यांची वाद होत असतो. याकडे जिल्हा पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दुकानदार आणि नागरीकांकडून बोलले जात आहे.