जळगाव प्रतिनिधी । येथील दर्जी फाऊंडेशनच्या विदयार्थ्यांनी पुणे न्यायालय भरतीत घवघवीत यश संपादन केले.
पुणे न्यायालतर्फे नुकताच अंतिम निकाल घोषीत करण्यात आला. यात जिल्हा न्यायालयात लिपिक पदासाठी दर्जी फाऊंडेशनच्या बारा विदयार्थ्यांनी यश मिळविले. तर राज्यातील विविध जिल्हा न्यायालय व पुणे जिल्हा न्यायालय भरतीत एकूण ३१ विद्यार्थ्यांची लिपिक पदी निवड आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या जळगांव, धुळे, नाशिक, रत्नागिरी व उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात दर्जी फाऊंडेशनचे विद्यार्थी यशस्वी झालेले होते. ताज्या निकालाने यशाची ही परंपरा कायम राहिली आहे.
पुणे न्यायालय भरतीत लिपिक पदावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उमाकांत यादव गायकवाड, रामदास अशोक ठाकरे, राजेश तानाजी राठोड, अभिजित नारायण लाठकर, अविनाश शशिकांत भोराडे, दिगंबर अभिमन गोंडवले, दिगंबर शहाजी बोराटे, जोतिराम किसन लावंड, प्रीती नामदेव जांभुळकर, शीतल शेषपाल कागडा, शिवाजी एकनाथ कोराळे, सुदर्शन भरत मामडगे यांनी यश मिळविले आहे. तर अमळनेर येथील गोरखनाथ महाजन या विद्यार्थ्याने देखील न्यायालय भरतीत यापूर्वीच यशाची बाजी मारली आहे. आगामी परीक्षांमधूनही दर्जी फाऊंडेशनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होतील असे मत गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे गोपाल दर्जी यांच्यासह सौ. ज्योती दर्जी, श्रीराम पाटील यांनी अभिनंदन केले आहे.