चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील हॉटेल राणी पार्क समोरील माधवनगर परिसरात एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील माधव नगर येथे भारत सुलतान संसारे वय ५९ हे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. १५ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत त्यांचे कुटुंब बाहेर गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली २ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ५२ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. असाएकुण २ लाख ५२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आला.

त्यानंतर भारत संसारे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप रोकडे हे करीत आहे.



