चाळीसगाव (प्रतिनीधी) जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय जवांनाना सुटीवर घरी येण्यासाठी दानापुर पुणे (गाडी क्र. अप १२१५० – डाऊन १२१४९ ) ही रेल्वे गाडी ईसोयीस्कर असून या गाडीला चाळीसगाव येथे थांबा द्यावा अशी मागणी रयत सेनेच्या वतीने डीआरएम रेल्वे भुसावळ यांना करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन आज ६ एप्रिल रोजी चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक सणस यांना देण्यात आले आहे.
रयत सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार आणि खान्देशातील जवान सीआरपीएफ , आर्मी, एसएसबी, आयटीबिपी , एयर फोर्समध्ये सेवा बजावत असलेल्या जवानांचे बिहार राज्यातील पटना येथे मुख्यालय आहे. खांदेशातील अनेक सुपुत्र हे भारतीय सैन्यदलात देश सेवेसाठी कार्यरत आहेत. हे जवान सुट्टी मिळाल्यानंतर रेल्वेने दानापुर रेल्वे स्थानकावरून दानापूर पुणे एक्सप्रस ने प्रवास करून भुसावळ येथे उतरून जळगाव, पाचोरा, धुळे व चाळीसगाव येथे येऊन ग्रामीण भाग व शहरी भागात आप आपल्या घरी येतात. त्यासाठी अनेक रेल्वेगाड्या आहेत पण जवानांना त्यांच्या नोकरी स्थानावरून घरी येण्यासाठी दानापुर पुणे ही रेल्वेगाडी खान्देशातील जवानांसाठी सोयीस्कर आहे. ही रेल्वे दानापूर येथून निघाल्यावर भुसावळ येथे थांबते आणि येथून थेट नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे दुसरा थांबा आहे. त्यामुळे या भागातील जवानांना भुसावळ व मनमाड येथे नाईलाजाने उतरून शंभर ते दीडशे किलोमीटरचा प्रवास रेल्वे बदलून व एसटीने किंवा जादा पैसे मोजून खाजगी वाहनाने करावा लागतो. म्हणून चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून गाडी क्र डाऊन १२१४९ दानापुरकडे जाणारी तर अप १२१५० पुणेकडे जाणारी दानापुर पुणे एक्सप्रेस रेल्वे गाडीस चाळीसगाव येथे थांबा द्यावा. त्यामुळे चाळीसगाव येथे उतरल्यावर येथून धुळे ,कन्नड ,औरंगाबाद, मालेगाव या ठिकाणी जाण्यासाठी जवानांना सोयीस्कर प्रवास करता येवुन वेळ आणि पैसाही वाचेल. याकडे रेल्वे प्रशासनाने भारतीय सैनिकांची देशसेवा लक्षात घेऊन विचार करून दानापुर पुणे एक्सप्रेस ला चाळीसगाव, पाचोरा ,जळगाव रेल्वे रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी रयत सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री भारत सरकार, जीएम मुंबई रेल्वे विभाग यांना पाठवण्यात आल्या असुन निवेदनावर भारतीय सैन्य दलातील जवान विनोद मांडोळे, समाधान महाजन , संभाजी पाटील, रवींद्र महाजन, मनोज ब्राह्मणकर, उमेश गोलाईत , हितेश पाटील व रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष दीपक राजपूत, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शहर अध्यक्ष योगेश पाटील , तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे ,समन्वयक रोहन पाटील, मधुकर अहिरे , रमेश पोतदार , उमेश गवळी, महेंद्र पाटील ,गौतम निकम ,रामदास मोची , विनोद कुमावत , विश्वनाथ काकळीज, कैलास देशमुख, निंबा पाटील, राहुल अल्हाड , मनीष नवले , भागवत जगताप , रोहिदास भागवत आदींच्या सह्या आहेत.