
अपघातात डंपरचे झालेले नुकसान
यावल (प्रतिनिधी)। येथील यावल भुसावळ रोडावर डंपरने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या बाबतचे वृत असे की, मंगळवार २६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास यावलहुन भुसावळकडे जाणाऱ्या वाळु वाहतुक करणाऱ्या डंबर क्रमांक (एम.पी.04 जी.ए.1436) या वाहनाने यावल भुसावळ रोडवर अण्णाच्या टायर पंक्चर गॅरेजवर पंक्चर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आढल्याने डंबरमध्ये अंजाळे गावासाठी जाणारे दामोदर गिरधर साळुंके (वय- ५५ वर्ष रा. पारगाव ता. चोपडा) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यावल तालुक्यात सकाळी १० ते १२ या दोन तासात दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहे.