यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथील मूळ रहिवासी असलेले चारूदत्त दिनेश पाटील ( सोनवणे ) या तरूणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हीस या परिक्षेत यश संपादन केले आहे.
तालुक्यातील डांभुर्णी गावातील रहीवासी निंबाजी काका सोनवणे ( सध्या रा. चोपडा ) यांचा नातू व गोंदिया येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत दिनेश निंबाजीराव सोनवणे यांचे चिरंजीव चारुदत्त दिनेश सोनवणे याचे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी ने घेतलेल्या कम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस सीडीएसच्या परीक्षेतून ऑल इंडिया रँक ९६ घेत भारतीय स्थलसेनेत लेफ्टनंट -परमनंट कमिशन ऑफिसर या पदी निवड झाली आहे.
अगदी दहावी किंबहुना त्या अगोदर पासूनच उराशी बाळगलेले स्वप्न त्याने जिद्दीने ,कठोर मेहनतीने व अभ्यासाने पूर्ण केल.या प्रवासात त्याला आईवडिलांचा सक्षम पाठिंबा लाभला.खर तर माझ्या दृष्टीने तो सिविल सर्विस मटेरियल आहे आणि तो आयएएस आणि आयपीएस म्हणून देखील त्याची निवड शंभर टक्के झाली असती असं त्याचं अकॅडमीक कॅलिबर आहे. परंतु त्याची जिद्द एकच लेफ्टनंट व्हायचे तेही इंडियन आर्मी मधेच त्यामुळे वायू सेनेची परीक्षा पास होऊनही त्याने पुढे मार्गक्रमण केले नाही. एवढच नव्हे तर मागच्या वर्षी पूर्वपरीक्षा ,मुख्य परीक्षा आणि सर्विस सिलेक्शन बोर्ड चा इंटरव्यू यशस्वी पूर्ण करून त्याची निवड झालेली होती मात्र मेडिकल मध्ये डोळ्याच्या अत्यंत छोट्याशा अडचणीमुळे त्याला जॉईन करता आलं नाही . नाहीतर आता त्याच प्रशिक्षण पूर्ण झालेले असते परंतु त्याने न खचता पुन्हा तयारी केली आणि यावर्षी विजयश्री अगदी दिमाखात खेचून आणली.
चारूदत्त पाटील याच्या या यशाबद्दल त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.