भरधाव दुचाकी धडकल्याने कारचे नुकसान

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अदित्य लॉनच्या पार्कींग झोन मध्ये दुचाकीने जोरदार धडक दिल्याने कारचे नुकसान केल्याची घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक अविनाश लाठी वय ३१ रा. प्रभात कॉलनी, जळगाव हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांची कार ही आदित्य लॉनी येथील पार्कींगमध्ये लावलेली होती त्यावेळी जयदीप राठोड रा. मन्यारखेडा याने दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएल ४४९४) ने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत अभिषेक राठी यांच्या कारच्या समोरील भागाचे नुकसान केले. याप्रकरणी अभिषेक लाठी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दुचाकीचालक जयदीप राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.

Protected Content