चोपडा प्रतिनिधी । येथे काल आलेल्या अचानक अवकाळी पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून मात्र प्रशासनाच्या कोणत्याही माणसाने दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दि ८ रोजी रात्री अचानक मुसळधार पावसामुळे शेतकर्यांसह व्यापार्यांचे ही लाखोंचे नुकसान झाले आहे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्यांचा हजारो क्विंटल मका , ज्वारी, बाजरी, सोयाबीन वाळण्यासाठी पसरवले होते परंतु अवघ्या १५ मिनिटांच्या अचानक मुसळधार पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर आल्या सारखी परिस्थिती करून दिली होती. या परिसरात गुडघ्यावर पाणी साचल्याने मका ,ज्वारी, बाजरी, सोयाबीन तरंगू लागले होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर धान्य रात्रभर पाण्यात राहिल्याने मका,ज्वारी,बाजरी, सोयाबीन भिजला व फुगून गेल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली आहे व्यापार्यांना बसने अवघड झाले आहे यात गणेश ट्रेडिंग – मका – ७०० क्विंटल सोयाबीन – ६० क्विंटल; कुशल ट्रेडिंग – मका – ८०० क्विं. ज्वारी – ३०० क्विंटल; खुशी ट्रेडिंग – मका – १५० क्विं. ज्वारी – १५० क्विं. बाजरी – ५० क्विंटल; नवकार ट्रेडिंग – ज्वारी – १५० क्विंटल; अरिंहत ट्रेडिंग – मका – १२० क्विं. ज्वारी – १५० क्विंटल; योगिजी ट्रेडिंग- मका – १२० क्विंटल; राज ट्रेडिंग – मका – ८० क्विं. ज्वारी – ३० क्विंटल; मगनलाल गोविंदा अग्रवाल – मका – ५०० क्विं. ज्वारी – २०० क्विंटल; सौरभ ट्रेडिंग – मका – २५० क्विं. सोयाबीन ५० क्विंटल; बोथरा ट्रेडिंग – मका – ४०० क्विं. ज्वारी – २०० क्विंटल; रितेश ट्रेडिंग – मका – १०० क्विंटल; जे.के.सुराणा – मका १२५ क्विंटल या मालाचे नुकसान झालेले आहे.
व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही प्रशासनाच्या कोणत्याही अधिकार्यांनी यांची दखल घेतली नाही. त्यामुळे येथील व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला होता त्यातही लाखोंचे नुकसान झाले होते. त्यावेळी व्यापार्याकडून तहसीलदाराना लेखी अर्ज दिला होता मात्र आज पर्यंत कोणत्याही अधिकार्याने साधी भेट देखील न दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.