चोरी केल्याचा संशय घेतल्यावरून चहाटपरीची तोडफोड करून नुकसान

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीतील मंदिराजवळचोरी करण्याच्या संशय घेतल्याच्या कारणावरून चहा विक्रेत्याची टपरीची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली होती.  या प्रकरणी मंगळवार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कमलेश बुधल दास चिमनाणी (वय-३८) रा.बाबा नगर, सिंधी कॉलनी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्यांचे सिंधी कॉलनीतील मंदिराजवळ चहाचे टपरी आहे. चहा विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. चहा विक्रेते कमलेश चिमनाणी यांनी  शाहरुख आणि शहा दोन्ही राहणार  तांबापुरा या दोघांवर गाडीवर चोरी केल्याचा संशय घेतला होता. याचा राग मनात ठेवून शाहरुख आणि शहा (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांनी ७ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता चहा विक्रेते कमलेश चिमनाणी यांचे चहाची टपरीचे तोडफोड करून नुकसान केले होते. हा प्रकार घडल्यानंतर चहा विक्रेता कमलेश चिमणानी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार करीत आहे.

Protected Content