भुसावळ प्रतिनिधी । येथील खडका रोड भागातील रजा टॉवर चौकात दाअवते इस्लामी हिंदतर्फे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ आज दि.२९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार व मौलाना अब्दुल हकीम नईमी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दाअवते इस्लामीचे प्रवक्ता अहमद रजा अत्तारी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, दाअवते इस्लामी हिंद हे गैरराजकीय आंतरराष्ट्रीय सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संघटना असून संपूर्ण जगात 200हून अधिक देशात सामाजिक कार्य करीत आहे. याचाच एक मुख्य भाग म्हणून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत संपूर्ण देशभरात १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीची संकल्पना समोर ठेवण्यात आली आहे. शहरात १ हजार आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात १२ हजार वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन तसेच देखरेख करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याचे स्पष्ट केले. तर पोलीस निरीक्षक देविदास पवार यांनीही वृक्षारोपण व संगोपनाचे आवाहन केले आहे. यावेळी हाजी शफी पहेलवान, हाजी शरीफ ठेकेदार, हाजी नईम पठाण, हाजी साबीर शेख, हाजी रशीद ठेकेदार, हाजी आशिक खान, हकीम चौधरी, हाफीज कमरोद्दिन, हाफीज गुलाम सरवर, कारी सज्जाद गुल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीही परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सैय्यद इमरान, आसिफ अत्तारी, इकरामोद्दीन पेंटर, सैय्यद साबीर, हाजी शाकीर, युसूफ बरकाती व रफिक रौशन यांनी अथक परिश्रम घेतले आहे.