Home Cities रावेर रावेर बाजार समिती सभापतिपदी डी.सी. पाटील यांची निवड

रावेर बाजार समिती सभापतिपदी डी.सी. पाटील यांची निवड


70203f5e 12ab 4b60 9e8b ec7bb0a5f924

रावेर (प्रतिनिधी) येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या सभापतिपदी डी.सी. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सभापती राजीव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी आज ही निवडणूक घेण्यात आली.

 

या निवडणुकीसाठी डी.सी. पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक डी. बागल यांनी काम पाहिले तर त्यांना गोपाळ महाजन यांनी सहकार्य केले. यावेळी उपसभापती कैलास सरोदे, सदस्य निळकंठ चौधरी, अरुण पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, राजीव पाटील, गोपाल नेमाडे, गोंडू महाजन, विनोद पाटील, सौ. प्रमिला पाटील, सौ. कल्पना पाटील पितांबर पाटील, प्रमोद धनके, श्रीकांत महाजन, उरमान तडवी, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद उपध्यक्ष नंदकिशोर महाजन, अनिल चौधरी, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी, सजंय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शिरीष वाणी, डॉ. सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवानी, रमेश पाटील, यादवराव पाटील आदींनी नवनिर्वाचित सभापतींचे अभीनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound