जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू असलेल्या ज्येष्ठ नागरिक शिबिरा दरम्यान ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदना व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यापीठात शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सायकल रॅली काढण्यात आली.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे दि. १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ज्येष्ठ नागरिक सहायता दुत प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. शुक्रवारी सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून ते सिनेट सभागृहापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिवहन अधिकारी श्याम लोही, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इंधे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सिनेट सदस्य ॲड. केतन ढाके, संचालक प्रा. आशुतोष पाटील, योग मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये जळगाव शहरातील सायकलपटू कामिनी धांडे, रसिका भोळे, रसिदा चुनावाला, छाया ढोले, डॉ. अनघा चोपडे, आरती व्यास, सुनील चौधरी, राम घोरपडे, सखाराम ठाकरे, राजु मराठे, राजु सोनवणे, रूपेश महाजन, आदर्श पाटील, गोपी महाजन, समीर रोकडे, भुपेश व्यास, सुभाष पवार, डॉ. सुयोग चोपडे, राजेश काळे, अतुल सोनवणे, दिपक पाटील, दिलीप मालुसरे तसेच शिबिरातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी होते.