सायबर क्राईम : बनावट कोर्टाची नोटीस पाठवून महिलेची २५ लाखांची फसवणूक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी करून इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस टाकून जळगाव शहरातील एका महिलेला २५ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविणकुमार, के.सी. सुब्रमन्यम, प्रदिप सांवत, आणि संदिप राव असे नाव सांगणारे अनोळखी सायबर ठगांनी जळगावातील एका महिलेला व्हाटसअपवरुन व्हॉइस कॉल तसेच व्हिडिओ व नॉर्मल कॉल आणि मेसेज करुन बनावटी सुप्रिम कोर्ट नोटीस तसेच इंटरपोलच्या नावाची रेड नोटीस तसेच गोपनीयता कायम ठेवण्यासाठी सीबीआयची नावाची नोटीस, असे सगळे बनावटी कागदपत्र व्हाटसअपद्वारे पाठवून महिलेला अटक करण्याची भीती दाखवली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेला सगळ्या केस मधुन बाहेर पडण्याचे खोटे आश्वासन देत इन्सपेक्शन फीच्या नावाखाली २५ लाख रुपये एका बँक खात्यात टाकायला सांगितले. भेदरलेल्या महिलेने पैशांची व्यवस्था करून सांगितलेल्या खात्या पैसे जमा केले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार जळगाव सायबर पोलिसात प्रविणकुमार, के सी सुब्रमन्यम, प्रदिप सांवत्, आणि संदिप राव असे नाव सांगणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिश गोराडे हे करीत आहे.

Protected Content