दोन्ही उमेदवार नवखे, जनतेचा कौल कुणाला ?
एरंडोल-रतिलाल देसले-पाटील । लोकसभा – २०२४ लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात एकूण १४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यातील दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये आमने सामने फाईट दिसून येत आहे. या लढतीत कोण बाजी मारणार ? याकडे मात्र आता जनसामान्यांचे लक्ष लागले असून निवडीबद्दल समर्थकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
एरंडोल विधानसभा मतदारसंघात २९० बुथवर एकूण २ लाख ८६ हजार ५४७ मतदारांपैकी १ लाख ७६ हजार ९६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान या वेळी ९४ हजार ९३८ पुरुष , ८२ हजार २२ महिला व दोन तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला.यात प्रामुख्याने एरंडोल तालुक्यातील मुस्लीम व वंचित यांचे मतदान निर्णायक ठरण्याचे चित्र समोर येत आहे.यात कासोदा,एरंडोल येथील या मतदारांना आपल्या बाजुने वळवण्याचा प्रयत्न कोणत्या उमेदवाराने केला हे येत्या ४ जून रोजी गुलदस्त्यातून बाहेर येणार या बद्दल कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये उत्सुकता आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघातील करण पवार व स्मिता वाघ यांच्यात आमने सामने ची खरी लढत आहे तसेच दोन्ही उमेदवार तालुक्यासाठी पाहिजे तेव्हढे परिचित नसल्याच्या चर्चा देखील आहेत.लोकांच्या मतानुसार पवार हे पारोळ्या पुंरते मर्यादित व वाघ देखील तालुक्यात परिचित नाहीत.एक भाजपचा उमेदवार व दुसरा आताच भाजप मधुन ठाकरे गटात खासदारांसोबत गेलेले असल्याचे लोकांच्या चर्चेत आहेत. हि लढत पवार विरुद्ध वाघ नसुन खासदार उन्मेष पाटील विरुद्ध मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रतिष्ठेची लढत असल्याचे बोलले जात आहे. लोकांच्या मते तालुक्यातून ग्रामीण भागात पवार यांचे वर्चस्व जास्त असल्याचे तर शहरी भागात वाघ यांना चांगला प्रतिसाद असल्याच्या चर्चा होत आहेत.आता मात्र ४ तारखेला कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता मतदारांमध्ये लागुन आहे.