रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, असे आवाहन तहसीलदार बंडू कापसे यांनी केले. रावेर तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष ॲड. धनराज पाटील, ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, पुरवठा अधिकारी डाळंबी सरोदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. किराणा, खते, बियाणे वा शेती अवजार खरेदी करताना ग्राहकांनी पक्के बिल घेणे आवश्यक असून, फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करता येते, असे तहसीलदारांनी सांगितले.
कार्यक्रमास तलाठी स्वप्निल परदेशी, बाळकृष्ण पाटील, विनोद चौधरी, कल्पेश पाटील, सुलेमान तडवी, प्रविण महाजन यांच्यासह ग्राहक व रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले.