मुंबई (वृत्तसेवा) भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांसोबत अवघ्या १० रुपयांवरून विक्रेत्यांचा वाद झाला असता विक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्री घडला. सोनीलाल असे या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाबाहेर २४ जूनच्या मध्यरात्री ही घटना घडली.
दादर स्टेशनबाहेर भाजी विक्रेता सोनीलाल आणि ग्राहक मोहम्मद हनीफ यांच्यात भाजी विकत घेण्यावरून वाद झाला. मामला होता फक्त १० रुपयांचा. मात्र, दोघांत वाद वाढल्यानंतर भाजी विक्रेता सोनीलालने ग्राहक मोहम्मद हनीफवर हल्लाच केला. भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या मानेवर आणि हातावर चाकूचे वार केले आणि हा हल्लेखोर भाजीविक्रेता पळून गेला.