धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात अंतर्गत वादातून दोन गटात वाद निर्माण झाल्याने दंगल उसळली. या दंगलीनंतर गावातील रस्त्यावर असलेली उभी वाहनांची जाळपोळ करण्यात आली तर दुकाने फोडून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाळधी गावात दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आले आहे. यावेळी गावात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात अंतर्गत वादातून दंगलीत झाल्याने येथील अनेक दुकानांची तोडफोड करून दुकाने जाळण्यात आली तसचे रस्त्यावर उभी असलेली वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. पोलीसांनी घटनेप्रकरणी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी अज्ञात २० ते २५ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाळधी दुरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच बुधवारी १ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेपासून ते गुरूवारी २ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.