अवैधपणे तीन बैलांची निर्दयीपणे वाहतूक; तीन जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयासमोरून अवैधपणे तीन बैलांची दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या तीन जणांवर सोमवारी १० जून रोजी रात्री ८ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ जून रोजी मध्यरात्री १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील प्रताप महाविद्यालयासमोरून एका वाहनातून ३ बैलांची दाटीवाटीने निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी १० जून रोजी रात्री ८ वाजता प्रताप महाविद्यालयासमोरून बोरोलो वाहन थांबविले. त्यामध्ये तीन बैलांना दाटीवाटीने बांधून त्यांची निर्दयीपणे वाहतूक करताना दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी हे वाहन जप्त केले असून तिघा बैलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील दशरथ माकडे, किरण बापू चौधरी आणि भूषण बापू चौधरी सर्व रा. धुळे यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे हे करीत आहे.

Protected Content