जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील नालवाडी गावाजवळून वाहनातून निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणारे वाहनावर चोपडा शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या गुरांची सुटका करण्यात आली. याबाबत गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चोपडा तालुक्यातील नालवाडी गावाजवळून महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक (एमपी ४६ जी १६१५) मधून गुरांची दाटीवाटीने बांधून त्यांना त्रास होईल आणि कत्तलीच्या उद्देशाने त्यांची वाहतूक होत असल्याची माहिती चोपडा शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता कारवाई केली आणि वाहन ताब्यात घेतले. यावेळी निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या गुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शामकांत धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास पाटील हे करीत आहे.




