वरणगाव दत्तात्रय गुरव । जळगाव जिल्ह्यातील जुने हेमाडपंती मंदिर भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे नागेश्वराचे हे प्रसिद्ध आहे. आजच श्रावणातील पहिला सोमवार नागेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मंदिर परिसरामध्ये गर्दी केली आहे.
कोरोनामुळे गेल्यावर्षी श्रावण महिन्यात सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आले होते. यावर्षी प्रशासनाने थोडीशी शूट दिल्यामुळे आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी नागेश्वराचे मंदिर खुले करण्यात आले आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शनासाठी सोडले जात आहे या नागेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता या मुळे जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून नागेश्वराच्या मंदिराकडे पाहिले जात आहेत.