राज ठाकरे यांना भाडोत्री असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि समोरच्या उमेदवाराचेही व्हिडीओ तुमच्याकडे आले असतील. मग सांगा तुम्हाला रेवण्णासारखा पाहिजे की अनिल देसाई सारखा पाहिजे? गद्दार, चारित्र्यहिन, भ्रष्टाचारी जमवून तरी त्यांना काही पुरत नाही, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याने तिकडे एक ठाकरे नावाचा हवा म्हणून एक भाड्याने घेतला आहे.

दुपारी उठून सुपारी चघळत बसले असतील. ते पुढे म्हणाले की, हल्ली मी काहीही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जातो. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो, यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले. अहो, मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन? माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मी देशभक्त आहे, मी अंधभक्त नाही. वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत. त्यांनी पुढे म्हणाले की, मोदी मुंबईला भिकारी करू पाहत आहेत. घाटकोपरमध्ये रोड शो झाला, तो हिणकस होता. आशिया खंडातील महाकाय होर्डिंग कोसळला. त्यात नेमके किती मृत्यू झाले, हा खरा आकडा समोर नाही. त्याच्याच बाजूला फुलांची उधळण करून, मोदींचा रोड शो काढण्यात आला. कशासाठी? सांत्वन करायला केलं का हे? या रॅलीसाठी मुंबई पालिकेने खर्च केला

 

Protected Content