यावल प्रतिनिधी-अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियाकडे परवान्याची विचारणा करणाऱ्या परसाळे बुद्रुक ( ता. यावल) येथील तलाठ्याच्या अंगावर आधी ट्रॅक्टर आणि नंतर पाठलाग करू नये म्हणून मोटारसायकल घालणाऱ्या दोन आरोपींविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
परसाळे येथील तलाठी समीर तडवी आणि कोतवाल अय्युब तडवी ( रा- बोरगाव खुर्द ) हे आज नेहमीप्रमाणे कार्यालयात बसलेले होते त्यावेळी त्यांच्यासमोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जाताना त्यांना दिसले . त्यांनी तलाठी तडवी यांच्या मोटारसायकलने त्यांचा पाठलाग केला . . ट्रॅक्टरचालकाने थांबवण्याचा इशारा करूनही ट्रॅक्टर न थांबवता तलाठी तडवी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला . तेवढ्या वेळेत त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नाहीत . त्यानंतर तलाठी आणि कोतवालांनीं असराबारी चौफुली जवळ त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला . तरीही तो नागमोडी वळणे घेत ट्रॅक्टर चालवत असल्याने त्याला थाम्बवणे शक्य झाले नव्हते . थोड्या वेळात त्यांच्या पाठीमागून दोन जण मोटारसाकळवर येताना दिसले होते ते दोन जण त्यांना ट्रॅक्टर जाऊ द्या असे सांगत होते . त्यांच्याकडेही चौकशी केल्यावर त्यांनी त्यांची मोटार सायकल तलाठी आणि कोतवाल यांच्या अंगावर गाळण्याचा आधी प्रयत्न करून नंतर ती रस्त्यावर आडवी लावत तलाठी आणि कोतवाल यांचा रास्ता अडवला . या गदारोळात ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेऊन निघून गेला .
त्यानंतर घातस्थळी केलेल्या चित्रीकरणावरून आणि फोटोवरून तलाठी तडवी यांनी या लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केले . त्यावेळी मोटारसायकल वरून आलेलं दोघे तेथे आले होते त्यांनी त्यावेळी त्याची नावे सांगितली .
स्वराज कम्पनीच्या निळ्या रंगाच्या या ट्रॅक्टरला आणि ट्रॉलीलाही नंबर प्लेट नव्हत्या . ट्रॅक्टरचालकाचे नाव आकाश सोनावणे ( वय -२० , रा- कोरपवली ) मोटारसायकल चालक रवी सोनावणे ( वय -२१ , रा- कोरपवली ) आणि त्यांचा साथीदार सलमान पटेल ( रा- कोरपवली ) अशी या आरोपींची नावे आहेत सलमान पटेल विरोधात तक्रार नसल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे . पुढील तपास पोलीस उप निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत .