Home क्राईम कोंबड्यावर कुत्रा भुंकल्याने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

कोंबड्यावर कुत्रा भुंकल्याने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

0
30
dog and cock
( प्रतिकात्मक छायाचित्र )

dog and cock
( प्रतिकात्मक छायाचित्र )

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळन्हावी गावात शेजारचा कुत्रा कोंबडयावर भुंकल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होऊन या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या संदर्भातील मिळालेली अधिक माहीती अशी की, तालुक्यातील कोळन्हावी येथील फिर्यादी पुंडलीक उर्फ कैलास तुकाराम सोळुंके यांचा कुत्रा कोंबडयांना पाहुन भुंकत असतांना फिर्यादिचा मुलगा याने कुत्र्यास हटकले. यामुळे चंद्रकांत उत्तम सोळुंके यांना वाईट वाटल्याने चंद्रकांत सोळुंके, प्रविण उत्तम सोळुंके , दिपक उत्तम सोळुंके, उत्तम सुकदेव सोळुंके यांनी फिर्यादीसह कुंदन आणि प्रतीक या त्यांच्या दोन मुलांना व लोंखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले आहे. यावरून चार संशयीतांविरूध्द येथील पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबात दुसर्‍या गटानेही तक्रार दिली आहे. यानुसार कैलास तुकाराम सोळुंके यांचेसह कुंदन कैलास सोळुंके, प्रतीक कैलास सोळुंके व नंदलाल हिरामन सोळुंके यांचेवर मारहाणीहसह आर्मअ‍ॅक्टरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुजीत ठाकरे व हे. कॉ. संजय तायडे करीत आहेत. दरम्यान, अगदी क्षुल्लक कारणावरून झालेली हाणामारी परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.


Protected Content

Play sound