Home Cities अमळनेर पालखी मिरवणुकीत छेड काढून मारहाण

पालखी मिरवणुकीत छेड काढून मारहाण

0
54

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथे पालखी मिरवणुकीत एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मठगव्हाण येथे काल सायंकाळी साईबाबांची दिंडी व पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यात एक मुलगी सहभागी झाली असतांना नितीन महेश पवार याने तिच्याशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्याचवेळी मुलीचे वडील रवींद्र गोरख सोनवणे बोलायला गेले असता सोनू दिलभर पवार, महेश आसाराम पवार, बापू आसाराम पवार यांनी रवींद्र सोनवणे याना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अरविंद कृष्णकांत पवार , विशाल शिवाजी पवार यांनी त्या तरुणीच्या घरात घुसून तिचा भाऊ चेतन व तरुणीला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

या संदर्भात तरुणीने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून नितीन पवार ,अरविंद पवार, विशाल पवार, सोनू पवार, महेश पवार व बापू पवार या सहा जणांविरुद्ध भादवी कलम ३५४ ब , ४४८ , १४३ , १४७ , ३२३ ,५०४ , ५०६,३४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनू व महेश याना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत चातुरे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound