जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील रेमंड कंपनीच्या समोर रस्त्यालगत उभी दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दुचाकी चोरट्यांना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
जळगाव तालुक्यातील आसोदा येथील चिंतामण भास्कर पाचपांडे वय २५ हा तरुण रेमंड कंपनीत कंत्राटी तत्त्वावर इलेक्ट्रिशिअन म्हणून कार्यरत आहे. १३ फेब्रुवारी रोजी चिंतामणी हा नेहमीप्रमाणे त्यांच्या एम एच १९ डी सी ११७१ या क्रमांकाच्या दुचाकीने कंपनीत आला. कंपनीच्या समोर बाहेरील बाजूस दुचाकी उभी केली. ड्युटी संपल्यानंतर घरी जायला निघाला असता दुचाकी दिसून आली नाही . सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळुन न आल्याने अखेर ४ दिवसांनंतर चिंतामण पाचपांडे यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली या तक्रारीवरून ३० हजार रुपयांची दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी अद्याप चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
दरम्यान दुचाकी चोरतांना २ चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यात दुचाकीजवळ काहीवेळ एकमेकांशी गप्पा करताना दिसून येत आहेत. थोड्या वेळाने दोघांपैकी एक जण दुचाकीला चावी लावून दुचाकी पार्किंगमध्ये बाहेर काढतो त्यानंतर दुचाकी सुरु करुन पसार होतो तर दुसरा पायी-पायी चालत निघुन जातो. या सीसीटीव्ही फुटेजवरून एमआयडीसी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे . घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.