मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. अशातच आता सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्याची सुरूवात सुद्धा केली आहे. इंडिया आघाडी व मविआमधील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
डहाणूचे विद्यमान आमदार विनोद निकोल यांना पुन्हा पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. त्यांची राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून ओळख आहे. आज १६ ऑक्टोबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांची राज्य व जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न झाली व बैठकीत एकमताने ठराव मंजूर करून आमदार विनोद निकोले यांना पुन्हा पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
विनोद निकोले हे आजही बागेत कुदळ-फावडे घेऊन काम करतात. त्यापूर्वी ते चहा ते वड्याचे दुकान चालवायचे. त्यानंतर मार्क्सवादी विचारांनी प्रभावित होऊन पक्षाचे काम करू लागले. त्यांनी २०१९ मध्ये भाजपचे तगडे उमेदवार पास्कल धानोरे यांचा पराभव केला होता.