धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील पाळधी येथील उड्डाणपुलाजवळील राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना जळगावकडून पाळधीकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाल्याची घटन घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुष्पाबाई रमेश न्याती वय ६४ आणि त्यांचे पती रमेश दगडूलाल न्याती वय ६८ दोन्हीरा. नाशिक हे पाळधी येथे नातेवाईकांकडे ३ मार्च रोजी आलेले होते. त्यावेळी साकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पाळधी गावाजवळील उड्डाणपुलाजवळील महामार्ग ओलांडत असतांना जळगावकडून पाळधीकडे येणारा ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ७५८० ) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दाम्पत्य जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी ८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.