धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। अंगणातील झाड कापण्याच्या कारणावरून दाम्पत्याला घरात घुसून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावात रविवारी ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या संदर्भात रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, प्रकाश सुभाष मोरे हे आपल्या पत्नी प्रतिभा मोरे यांच्यासोबत पिंप्री गावात वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या घरासमोर असलेले झाड हे धोकादायक असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने तोडण्याचे काम सुरू केले होते. याचा राग आल्याने गावातील राहणारे समाधान योगास सोनवणे, छगन उर्फ भुऱ्या योगराज सोनवणे, सचिन मधुकर मोरे आणि यांच्यासह इतर तीन ते चार जण सर्व राहणार पिंप्री खुर्द ता. धरणगाव यांनी रविवारी ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता दाम्पत्याच्या घरात घुसून दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात प्रतिभा मोरे यांनी धरणगाव पोलिसात यासंदर्भात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार मारहाण करणारे समाधान योगराज सोनवणे, छगन उर्फ भुऱ्या योगराज सोनवणे, सचिन मधुकर मोरे यांच्यासह इतर तीन ते चार जनावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाही जितेंद्र भदाणे हे करीत आहे.