Home क्राईम जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला बेदम मारहाण; तर शेती साहित्याचे नुकसान

जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला बेदम मारहाण; तर शेती साहित्याचे नुकसान


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील बांबरूड गावात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका दाम्पत्याला बेदम मारहाण केली आणि शेतातील १५ पाईप फोडून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिराबाई ईंदलसिंग परदेशी (वय ३५) या शेतात पाणी भरण्यास गेल्या असताना संशयित आरोपी गणेश थानसिंग परदेशी, रमेश थानसिंग परदेशी आणि ईश्वर थानसिंग परदेशी (सर्व रा. बांबरूड) यांनी त्यांच्याशी वाद घातला होता. यापूर्वी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये चपटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपींवर पोलीसात तक्रार देण्यात आली होती. याच गोष्टीचा राग आरोपींच्या मनात होता.

सोमवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, बांबरूड गावातील फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक जागेवर हा वाद पुन्हा उफाळून आला. गणेश थानसिंग परदेशी, रमेश थानसिंग परदेशी आणि ईश्वर थानसिंग परदेशी (सर्व रा. बांबरूड प्र.भा.) यांनी हातात काठ्या घेऊन फिर्यादीचे पती ईंदलसिंग परदेशी यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी त्यांना पोटावर, पायावर आणि हातावर काठीने बेदम मारहाण करून दुखापत केली.

मारहाण करूनच न थांबता, आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या पतीला अश्लील शिवीगाळ करत “तुम्हाला जीवे ठार मारून टाकू” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी शेताच्या सामाईक बांधावर ठेवलेले सुप्रिम कंपनीचे १५ सिंचन पाईप फोडून मोठे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound