जळगाव प्रतिनिधी । जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून प्रारंभ झाला असून या दोन्ही मतदारसंघांसाठी अनुक्रमे २४ आणि २३ फेर्या होणार आहेत.
जळगावात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील तर महाआघाडीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात काट्याची टक्कर झाली. तर रावेरमध्ये महायुतीच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना महाआघाडीचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आव्हान दिले होते. या दोन्ही मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले होते. यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ५६.१२ टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी ६१.४० टक्के मतदान झाले होते. याची मोजणी आज सकाळी आठ वाजेपासून होणार आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अजयकुमार, रावेर मतदार संघाचे निरिक्षक छोटेलाल प्यासी जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम टपाली आणि ईटीबीपीएसद्वारे झालेले मतदान मोजण्यात येईल. यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. जळगाव व रावेरसाठी अनुक्रमे २४ आणि २३ फेर्या होणार आहेत.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जनतेला निकालाच्या अचूक आकडेवारीसह सद्यस्थितीतला कल आणि यावरील विविधांगी राजकीय विश्लेषण लाईव्ह ट्रेंडस् न्यूजवर मिळणार आहे. सकाळी आठ वाजता फेसबुक आणि युट्युब लाईव्हवरून विविध मान्यवर आपली मते मांडणार आहेत. याला आपण आमच्या पोर्टलच्या लिंकवरही पाहू शकतात. तर हॅथवे केबलवर आपतक वृत्त वाहिनीच्या माध्यमातूनही आपण आपल्या टिव्हीवर हे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतात. याच्या लिंक खालीलप्रमाणे आहेत. दिवसभर चालणारा हा कार्यक्रम श्रमसाधना ट्रस्टचे बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय; वसंतस् द सुपरशॉप, सुरेश कलेक्शन, सनशाईन मोटर्स ( व्हेस्पा व अप्रिलिया शोरूम ) आणि अगम काजू जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात येत आहे.
पोर्टल : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
युट्युब अकाऊंट : https://www.youtube.com/channel/UCf2wQNf8D1ChP5h3-11O97A
हॅथवे केबल वरील चॅनल क्रमांक २६