नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकार आता भ्रष्ट व अक्षम सरकारी कर्मचार्यांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. या संदर्भात मोदी सरकारने अशा सरकारी कर्मचार्यांना ओळखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याचबरोबर मोदी सरकार भ्रष्ट व अपात्र कर्मचार्यांना सेवानिवृत्त केले जाईल. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने सर्व विभागांना या संदर्भात आदेश जारी केले आहेत.
केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचार्यांच्या कामाचा रेकॉर्ड तपासणार आहे. यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. यानुसार अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल. जे भ्रष्ट, अयोग्य असल्याचे आढळून येतील त्यांना निवृत्ती घेण्यास सांगितले जाईल. याबाबत, एक रजिस्टरही तयार करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ३० वर्षे पूर्ण केलेल्या किंवा ५० ते ५५ वर्षे वयाच्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तपासण्यास केंद्र सरकारने सांगितलं आहे. ३० वर्षे पूर्ण झालेल्या किंवा ५०-५५ वर्षे वयाच्या सरकारी कर्मचार्यांच्या सेवेच्या नोंदीमध्ये अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.