भुसावळ, प्रतिनिधी |शहरात गेल्या दोन दिवसांपासुन सायंकाळी पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या लाभ क्षेत्रातील हतनूर धरणाचे आज शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता चार दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे.
शुक्रवारी हतनूर धरणातून १ हजार ५५९ क्युमेक्स ( ५५०६३ क्युसेस )प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून धरणाची पाण्याची पातळी २१३.६६० मिमी आहे. ८८.२४ टक्के जलसाठा आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात बऱ्हाणपूर , एरडी, चिखलदरा, लखपूरी, लोहारा तर अकोला येथे झालेल्या पावसामुळे धरणात सायंकाळी ८८.२४ टक्के जलसाठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.