Home क्राईम जळगावात नगरसेवकावर कुर्‍हाडीने हल्ला

जळगावात नगरसेवकावर कुर्‍हाडीने हल्ला

0
41
kulbhushan patil

kulbhushan patilजळगाव प्रतिनिधी । येथील भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या कार्यालयात दोघांनी कुर्‍हाडीने हल्ला चढविला असून यात त्यांच्या हाताला दुखापत झाल्याची घटना रात्री घडली.

याबाबत वृत्त असे की, कुलभूषण पाटील हे गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंप्राळा परिसरातून निवडून आलेले आहेत. त्यांचे पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केटमध्ये संपर्क कार्यालय आहे. याच कार्यालयावर रात्री आठच्या सुमारास अक्षय उर्फ बाबू बन्सीलाल धोबी आणि विशाल भीकन कोळी या दोघांनी हल्ला चढविला. त्यांनी कुर्‍हाडीसह कुलभूषण पाटील यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वार चुकवल्यामुळे पाटील बचावले. तथापि, त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. दरम्यान, दोन्ही हल्लेखोरांनी पळ काढला. या संदर्भात रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बाबू बन्सीलाल धोबी आणि विशाल भीकन कोळी हे नुकतेच जामीनावर सुटले होते. त्यांच्या गुन्ह्यात कुलभूषण पाटील यांनी पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज पुरवल्याचा संशय या दोघांना आल्याची शक्यता असून यातूनच हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


Protected Content

Play sound